भारतीय अभियंते उतरले कसोटीला; रत्नागिरी गॅस, वीज प्रकल्प झाले सुरू

यशस्वी वीजनिर्मिती, अनेक उपकरणे लागली बदलावी
भारतीय अभियंते उतरले कसोटीला; रत्नागिरी गॅस, वीज प्रकल्प झाले सुरू

गुहागर : २००२ मध्ये कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात गेलेल्या दाभोळ वीज प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या काळात झाला. ८ जुलै २००५ ला या प्रकल्पाचे नामकरण रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प (RGPPL) असे करण्यात आले. वीजनिर्मिती(eletricity) आणि परदेशातून द्रवरूप नैसर्गिक वायू आणून त्याचे वायूमध्ये रूपांतर करून देशात वितरण करण्याचे उद्दिष्ट होते. ते साकारण्यासाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन NTPC) आणि गॅस इंडिया ऑथोरिटी लिमिटेड (GAIL) या कंपन्यांकडे ‘आरजीपीपीएल’ची जबाबदारी सोपविण्यात आली.

भारतीय अभियंते उतरले कसोटीला; रत्नागिरी गॅस, वीज प्रकल्प झाले सुरू
रायगड जिल्ह्यात हजारो किमीचा प्रवास करून देशी व विदेशी स्थलांतरित पाहुणे दाखल

वित्तीय संस्थांची झालेली आर्थिक कोंडी सोडवण्यासाठी एनटीपीसी आणि गेल या कंपन्यांनी दाभोळ वीज प्रकल्प ताब्यात घेण्यासाठी आठ हजार ४८५ कोटी रुपये दिले. ‘आरजीपीपीएल’मध्ये एनटीपीसी आणि गेल यांची प्रत्येकी २८.३३ टक्के, राज्य वीज मंडळाची १५ टक्के तर आयडीबीआय, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय, बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँक यांची २८.३३ टक्के भागीदारी असेल, असा निर्णय घेण्यात आला. प्रकल्पातून प्रतिदिन एक हजार ९६४ मेगावॉट वीजनिर्मिती होण्यासाठी ८.५ एमएमएससीएमडी गॅसची आवश्यकता होती. हा गॅस पुरवण्यासाठी ओएनजेसी (०.९ एमएमएससीएमडी) आणि रिलायन्स (डी ६ गोदावरी बेसिनमधून ७.६ एमएमएससीएमडी) या कंपन्यांसोबत करार करण्यात आला.

भारतीय अभियंते उतरले कसोटीला; रत्नागिरी गॅस, वीज प्रकल्प झाले सुरू
झुंड में तो सूअर आते हैं, शेर अकेला ही आता है!

सारे गुलाबी चित्र होते

अवघ्या वर्षभरात वीज प्रकल्पातील तीनपैकी एक फेजमधून वीजनिर्मिती करण्यात आरजीपीपीएलला २००६ मध्ये यश आले. दाभोळ वीज कंपनीने नाफ्त्यापासून वीजनिर्मिती सुरू केली होती. मात्र, आरजीपीपीएलने नाफ्त्यावर चालणारा हा प्रकल्प देशातील नैसर्गिक वायूवर चालविण्यास सुरुवात केली. टप्प्याटप्याने तीन फेज सुरू झाले. आरजीपीपीएलमधून १२०० ते १५०० मेगावॉट वीजनिर्मिती सुरू होती. वीज मंडळ सुमारे २.३० प्रतियुनिट दराने खरेदी करीत होते. त्यामुळे सारे गुलाबी चित्र होते.

अभियंत्यांपुढे मोठे आव्हान प्रकल्प पुन्हा सुरू करणे, हे भारतीय अभियंत्यांपुढे मोठे आव्हान होते. प्रकल्पाची उभारणी अमेरिकन तंत्रज्ञानानुसार झाली होती. वापरलेले साहित्य पूर्णपणे विदेशी बनावटीचे होते. प्रकल्पाच्या आराखड्याचा संपूर्ण अभ्यास करावा लागला. अनेक उपकरणे बदलावी लागणार होती. त्यामुळे आरजीपीपीएलने पुन्हा एकदा प्रकल्प सुरू करण्यासाठी दाभोळ वीज कंपनीत भागीदारी असलेल्या जनरल इलेक्ट्रिक या कंपनीची मदत घेतली.

एक नजर

  1. तीनपैकी एक फेजमधून वीजनिर्मिती करण्यात २००६ मध्ये यश

  2. आरजीपीपीएलकडून प्रकल्प नैसर्गिक वायूवर चालवण्यास प्रारंभ

  3. टप्प्याटप्प्याने तीन फेज सुरू

  4. काही वर्षांत १५०० मेगावॉट वीजनिर्मिती

  5. वीज मंडळ सर्व वीज खरेदी करीत होते सुमारे २.३० प्रतियुनिट दराने

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com