झुंड में तो सूअर आते हैं, शेर अकेला ही आता है; राणेंच्या बॅनरवर दिसला 'वाघ' I Narayan Rane | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narayan Rane Banners In Ratnagiri

संतोष परब हल्ला प्रकरणानंतर नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातलं राजकीय वैर पुन्हा एकदा समोर आलंय.

झुंड में तो सूअर आते हैं, शेर अकेला ही आता है!

रत्नागिरी : गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचा (Sindhudurg District Central Co-operative Bank Election) निकाल नुकताच जाहीर झाला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता आलीय. भाजपच्या सिद्धिविनायक पॅनलनं (Siddhivinayak Panel) 11 जागांवर विजय मिळवला, तर महाविकास आघाडीच्या पॅनेलला (Mahavikas Aghadi Panel) आठ जागांवर विजय मिळवता आला. यामुळं सिंधुदुर्गवर मंत्री नारायण राणेंचं वर्चस्व पुन्हा सिध्द झालंय.

हेही वाचा: 'महाविकास आघाडी सरकार पडेल, राणेंच्या रुपानं आणखी एक माणूस आलाय'

संतोष परब हल्ला प्रकरणानंतर नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यातलं राजकीय वैर पुन्हा एकदा समोर आलंय. भाजप आमदार नितेश राणे यांचं दक्षिण मुंबईत गिरगाव येथील भाजपच्या (BJP) कार्यालयाबाहेर आणि चर्चगेट स्टेशनबाहेर एक बॅनर (Banner) लावण्यात आलं. त्या बॅनरवर नितेश राणे यांचा एक फोटो असून ते हरवले असल्याची खोचक माहिती लिहिण्यात आली होती. तसेच त्यांना शोधून काढणाऱ्या व्यक्तीला कोंबडी बक्षीस देण्यात येईल, असंही राणे कुटुंबीयांना झोंबणारा मचकूर लिहिला गेला होता. पण, सिंधुदुर्ग निवडणुकीतील विजयानंतर आता भाजपचे बॅनर झळकू लागले आहेत.

हेही वाचा: Political News : निवडणुकीत दोन साखर सम्राटांत चुरस वाढली

जिल्हा बँकेच्या विजयानंतर, रत्नागिरीत राणे कुटुंबाच्या समर्थनार्थ बॅनर बाजी पहायला मिळतेय. या बॅनरवर 'झुंड मे तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है! माईंड इट, अशा आशयाचं बॅनर रत्नागिरीत (Narayan Rane Banners In Ratnagiri) झळकलेलं दिसतंय. यावरती मंत्री नारायण राणे व नितेश-निलेश राणे (Nilesh Rane) यांचा देखील फोटो पहायला मिळतोय. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजप म्हणजेच, राणे गटानं सत्ता मिळवल्यानंतर आता याचे राजकीय पडसाद कोकणात (Konkan) देखील उमटू लागले आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्यात आता राणे समर्थकांनी त्यांच्या विजयाबद्दल बॅनर लावलेत. यामुळं कोकणात भाजपकडून पोस्टर वाॅर सुरु झालंय.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top