Ratnagiri Hapus Mango: रत्नागिरीत ऑगस्टमध्येच हापूसला मोहोर, उत्पादनावर परिणामाच्या शक्यतेनं चिंता

Hapus Mango Blossoms Early in Ratnagiri: रत्नागिरीत ऑगस्टमध्येच हापूस आंब्याला मोहोर आल्याने बागायतदारांची चिंता वाढली आहे. बदलत्या हवामानामुळे मुख्य हंगामातील उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Ratnagiri Hapus Mango

Ratnagiri Hapus Mango

esakal

Updated on

रत्नागिरी: हापूस आंब्याच्या हंगामाचे चित्र यंदा बदलत्या हवामानामुळे पुरते विस्कटलेले आहे. नेहमी हिवाळ्यात येणारा आंब्याचा मोहोर यंदा ऑगस्टच्या अखेरीस, म्हणजेच पावसाळ्यातच फुलल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदार चिंतेत पडले आहेत. गणपतीपुळे, पावस परिसरात या कातळ भागातील हापूस आंबा कलमांना वेळेआधीच मोठ्या प्रमाणात मोहोर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यंदा माॅन्सून कालावधी अनियमिततेच्या गर्तेत अडकलेला आहे. जून महिन्यातच कोरड्या दिवसांचा कालावधी अधिक होता. ऑगस्ट महिन्यातही अनेकवेळा उन्हाचा कडाका सहन करावा लागत आहे. सलग दोन ते तीन दिवस पावसाने घेतलेली विश्रांती आणि त्यानंतर अचानक पडलेले कडक ऊन याचा परिणाम हापूस आंबा कलमांवर झालेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Asim Sarode Ratnagiri speech
Ratnagiri Airport latest news
Ratnagiri Rainfall 2026
Konkan cashew farmers government compensation
Marathi News Esakal
www.esakal.com