रत्नागिरी: जिल्ह्यात गुरुकुल यंत्रणा सुरू करण्याचा मानस

उदय सामंत ; आयसीटी महाविद्यालयाच्या शाखेसाठी प्रयत्न
रत्नागिरी: जिल्ह्यात गुरुकुल यंत्रणा सुरू करण्याचा मानस
sakal
Updated on

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन हब करण्याच्या माझ्या वक्तव्याची काहींनी थट्टा केली होती; मात्र संस्कृत विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राच्या उदघाटनाने त्यांना चोख दिले आहे. आयसीटी महाविद्यालयाची शाखा आसाम, मॉरिशसनंतर रत्नागिरीत सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून स्किल डेव्हलपमेंट नॉलेजच्यादृष्टीने फायदा होणार आहे. तसेच गुरुकुल यंत्रणाही सुरू करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

रत्नागिरी: जिल्ह्यात गुरुकुल यंत्रणा सुरू करण्याचा मानस
हृदयविकाराचे मृत्यू रोखणारा स्टेमी प्रकल्प हरवला

कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे उदघाटन झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्व विद्यापिठाच्या रत्नागिरी उपकेंद्रामध्ये अनेक शॉर्टटाईम अभ्यासक्रम आहेत. त्या अभ्यासक्रमांची तुलना महाराष्ट्राच्या परंपरेशी व संस्कृतीची करावी लागेल. इंजिनिअरिंग, वैद्यकीय, टेक्निकली शिक्षण घेताना महाराष्ट्राची परंपरा साधली पाहिजे. म्हणून या उपकेंद्राचे आज उदघाटन करण्यात आले.

आयसीटी महाविद्यालयाची शाखा रत्नागिरीत सुरू करण्याचा प्रयत्न आहे. मॉरिशेस आणि आसाममध्ये त्या सुरू आहेत. त्यानंतर रत्नागिरीत सुरू होतील. स्किल डेव्हलपमेंट नॉलेज यातून मिळण्यास मदत होणार आहे. रत्नागिरी एज्युकेशनल हब होईल, या माझ्या वक्तव्याची काहींनी खिल्ली उडवली होती; मात्र उपकेंद्र सुरू करून अनेकांची तोंड बंद केली. रत्नागिरी अनेक शैक्षणिक उपक्रम लवकर सुरू होणार आहेत. गुरूकुल यंत्रणा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. गणपतीपुळ्याच्या एका ट्रस्टशी संपर्क साधला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयात गुरूकुल ही यंत्रणा नाही. ती सुरू करण्याचा प्रयत्न आहे.

कॉलेज सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय

महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय काही दिवसात घेतला जाईल. तशी मानसिकता विद्यार्थी आणि पालकांनी ठेवून तयारीला लागावे. रामटेक विद्यापिठाचे वरखडे यांची नुकतीच चर्चा झाली. कोविडची परिस्थिती काय, कसे कॉलेज सुरू करू शकते, तसा अहवाल शासनाला पाठवावा, असे कुलकुरू यांनी सांगितले आहे. माहिती आल्यानंतर टास्कफोर्स आणि डिझास्टर मॅनेजमेंटशी चर्चा करून कॉलेज सुरू करण्याचा निर्णय काही दिवसात घेऊ, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

अनेकांची चाचणी झाल्याने चाचण्यांची संख्या कमी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या रुग्णवाहिकांचा अनुशेष आता पूर्ण झाला आहे. जिल्ह्याला आणखी ३४ रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला ११ रुग्णवाहिका मंजूर आहेत. गेल्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याला जास्त रुग्णवाहिका दिल्या, या वेळी कमी दिल्या आहेत.

रत्नागिरीला मिळालेल्या रुग्णवाहिकांपैकी ७ सिव्हिल, महिला रुग्णालय आणि प्रादेशिक मनोरुग्णालयाला दिल्या जाणार आहेत. ऑक्सिजनबाबत आपण स्वयंपूर्ण झालो आहे. आता चाचण्याही कमी होत आहेत, म्हणजे अनेकांची तपासणी झाली आहे. परत, परत तपासणे योग्य नाही. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट आता कमी झाला आहे, असे सामंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ratnagiri food safety raid on fake paneer
Mumbai Goa Highway landslide update
MNS threatens protest in Sudhagad Taluka against the installation of smart meters by Mahavitaran
ANS (Andhashraddha Nirmulan Samiti) and women's organizations in Pen organize 'Vatsavitri te Vatdharitri' campaign for tree plantation
Marathi News Esakal
www.esakal.com