715 crore Jaigad Tawsal bridge
esakal
रत्नागिरी : रत्नागिरी आणि गुहागर परिसराला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी जयगड - तवसाळ खाडीपुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तब्बल ७१५ कोटी रुपये खर्चून हा भव्य केबल स्टेड पूल उभारला जात (Jaigad Tawsal cable stayed bridge) आहे. सुमारे २.९ किलोमीटरचा हा पूल पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले आहे.