Kashedi Tunnel lighting failure
esakal
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याच्या प्रकाश व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले (Kashedi Tunnel on Mumbai-Goa Highway) आहे. बुधवार, ता. १६ सप्टेंबर रोजी रात्री १०.४३ वाजता टिपलेल्या व्हिडिओमध्ये बोगद्याचा तब्बल ५० टक्के भाग अंधारात असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. विशेषतः चिपळूण दिशेच्या प्रवेशद्वाराकडील मोठ्या भागातील दिवे बंद असल्याचे निदर्शनास आले.