Jagbudi River Pollution : खेडमधील जगबुडी नदीत कचऱ्याचे साम्राज्य! मगरींच्या अधिवासाला धोका; क्रोकोडायल पार्कचे स्वप्न धूसर?

Jagbudi river pollution in Khed : खेडमधील जगबुडी नदीत प्लास्टिक, मद्याच्या बाटल्या आणि कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जलप्रदूषणासह मगरींच्या अधिवासाला धोका निर्माण झाला असून क्रोकोडायल पार्कचे स्वप्नही धूसर झाले आहे.
Crocodile population in Jagbudi river

Crocodile population in Jagbudi river

esakal

Updated on: 

खेड : शहरालगतच्या जगबुडी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला (Jagbudi river plastic waste problem) आहे. प्लास्टिकच्या बाटल्या, रिकाम्या मद्याच्या बाटल्या, कॅरिबॅग आणि अन्य कचऱ्यामुळे नदीपात्राचे विद्रुपीकरण झाले आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे नदीतील जैवविविधतेसह मगरींच्या अधिवासालाही धोका निर्माण झाला आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी कचरा तरंगताना दिसत असून, कुजणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. शहरालगतच्या भागासह नदीकिनारी वसलेल्या भोस्ते, वेरळ आणि भरणे या गावांमधूनही नदीपात्रात कचरा टाकला जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Loading content, please wait...