Raghuveer Ghat road condition in Khed
esakal
खेड : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाकांक्षी पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असतानाच, खेड तालुक्यातील रघुवीर घाट मार्गाच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका बाजूला कोट्यवधी रुपये खर्च करून पूल उभारला (Raghuveer Ghat road latest news) असला, तरी दुसरीकडे या पुलाकडे जाणाऱ्या जोडरस्त्याची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतरही खराब घाटमार्गामुळे प्रवाशांना खडतर व जीवघेण्या प्रवासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.