Amba Ghat Tunnel Project : आंबा घाटाला मिळणार बोगद्याचा पर्याय! कागल ते रत्नागिरी प्रवास आता अवघ्या एका तासात; प्रकल्प अहवाल तयार करण्याची मंत्री गडकरींकडून सूचना

Ratnagiri Kolhapur Amba Ghat tunnel project latest news : रत्नागिरी-कोल्हापूरदरम्यानच्या आंबा घाटातील प्रवासाला पर्याय म्हणून टनेल उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नितीन गडकरी यांनी डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Amba Ghat Tunnel Project

Amba Ghat Tunnel Project

esakal

Updated on: 

रत्नागिरी : रत्नागिरी आणि कोल्हापूरदरम्यानचा खडतर अन् वळणावळणाचा प्रवास आता भविष्यात अधिक वेगवान आणि सोपा होणार आहे. आंबा घाटातील अवघड प्रवासाला पर्याय म्हणून बोगदा (टनेल) उभारण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या (Nitin Gadkari Amba Ghat tunnel DPR approval) आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी या टनेलच्या सविस्तर प्रकल्प अहवालासाठी (DPR) सूचना दिल्या आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास कागल ते रत्नागिरी हा प्रवास अवघ्या एका तासात शक्य होईल, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...