esakal | पुढील 5 दिवस रत्नागिरी - कोल्हापूर हायवे वाहतूकीसाठी बंद
sakal

बोलून बातमी शोधा

पुढील 5 दिवस रत्नागिरी - कोल्हापूर हायवे वाहतूकीसाठी बंद

पुढील 5 दिवस रत्नागिरी - कोल्हापूर हायवे वाहतूकीसाठी बंद

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी : रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर साखरपा ते आंबा घाट या सेक्शनमध्ये १२ ठिकाणी दरड कोसळल्यामुळे महामार्गाचे नुकसान झाले आहे. या महामार्गाचा काही भाग तीन ठिकाणी तुटला आहे. सदर ठिकाणी महामार्गावरील दरड कोसल्यामुळे महामार्गावरील मलबा काढण्याचे काम यद्ध पातळीवर सुरू आहे. येथील खचलेला भरावं दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. दुरुस्तीचे काम पुढील पाच दिवस चालू राहणार आहे, त्यामुळे पुढील पाच दिवस महामार्ग बंद राहणार आहे आणि त्यानंतर या महामार्गाची पुन्हा पाहणी करून, महामार्गावर फक्त हलक्या वाहनाची वाहतूक सुरू करता येईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी दिली आहे.

हेही वाचा: गोव्यातील 'या' महत्वाच्या गोष्टी माहित आहेत? जाणून घ्या

loading image
go to top