गोव्यातील 'या' महत्वाच्या गोष्टी माहित आहेत? जाणून घ्या

दरवर्षी मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक येथे हजेरी लावतात.
गोव्यातील 'या' महत्वाच्या गोष्टी माहित आहेत? जाणून घ्या

गोव्याला भारताची फन राजधानी म्हणून ओळखले जाते. गोव्यामध्ये असणारे सुंदर समुद्रकिनारे, हॉटेल्स, रेस्टॉरंट यासाठी गोवा प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारी असणारे वातावरण आणि रात्रीच्या जीवनाचा मनमुराद आनंद, काही जुनी स्मारके आणि मंदिरे यांसाठी गोवा ओळखला जातो. भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध असणारे आणि पर्यटकांनी अधिक पसंती देणारे राज्य म्हणून याची ओळख आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक येथे हजेरी लावतात. गोव्या सोबत अनेक गोष्टी जोडल्या आहेत, अशा या राज्याबद्दल काही महत्त्वाच्या आणि इंटरेस्टेड गोष्टी पाहणार आहोत..

गोव्यातील बारची संख्या

गोवा हे छोटे राज्य आहे. परंतु अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्यामध्ये अल्कोहोल सर्वात कमी रुपयांत विकले जाते. त्यामुळे मोठ्या संख्येने येथे बाहेरचे पर्यटक येत असतात. गोव्यात साधारणत: 700 बाराची (अल्कोहोल) संख्या असून येथील प्रत्येक बारला (ligally) लायसन्स दिले आहे.

गोव्यातील 'या' महत्वाच्या गोष्टी माहित आहेत? जाणून घ्या
मध्य प्रदेशातील ही आहेत सुंदर ठिकाणे..तुम्ही पाहून व्हाल थक्क

जुनी प्रिंटिंग प्रेस आणि मेडिकल कॉलेज

गोव्यामध्ये भारतातील पहिली प्रिंटिंग प्रेस आणि मेडिकल कॉलेज सुरु झाले आहे. काही कथांच्या आधारे पोर्तुगालांच्या शासनकाळात येथे अठराव्या शतकात वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना झाली होती. आशिया खंडातील हे सर्वात जुने मेडिकल कॉलेज म्हणून ओळखले जाते. तसेच 1956 मध्ये भारतात पहिली प्रिंटिंग प्रेस गोव्याच्या सेंट पॉल कॉलेजमध्ये सुरु होती. आजवर ही आशियातील फर्स्ट एव्हर प्रिंटिंग प्रेस राहिली आहे.

सर्वात उंच धबधबा

गोव्यातील दूधसागर धबधबा ३१० मीटर उंच आणि ३० मीटर असा देशातील काही उंच धबधब्यांपैकी एक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील भगवान महावीर अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानामध्ये हा धबधबा आहे. पुरणांमध्ये धबधब्याचे नाव एका राजकुमारीच्या नावावरून पडले आहे, असे म्हटले जाते. एका कथेमध्ये सांगितले आहे की, एक दिवस ती राजकुमारी स्नान करत असताना काही लोक तिला पाहत होते. त्या लोकांनी तिला पाहु नये म्हणून तेथे असलेल्या लोकांनी त्यांच्याकडे उपलब्ध असणारे दूध तिच्या अंगावर उडवायला सुरूवात केली. तेव्हापासून या धबधब्याला दूधसागर असे नाव पडले आहे.

गोव्यातील 'या' महत्वाच्या गोष्टी माहित आहेत? जाणून घ्या
ना छप्पर ना दरवाजा! तरीही कपल्सचे फेवरेट; असे हॉटेल पाहिले का?

नेवल एविएशन म्युझियम

गोव्यामध्ये असलेले हे संग्रहालय आशियातील पहिले संग्रहालय आहे. जगभरातील अशा काही महत्वाच्या सहा संग्रहालयांपैकी हे एक आहे. गोव्यातील हे संग्रहालय भारताच्या इतिहासाचे दर्शन करते. यामध्ये भारताचा पहिला एअरक्राफ्ट दाखवला आहे. याशिवाय कंटेम्पररी एअरक्राफ्ट, जेट ट्रेनर, हेलिकॉप्टर आणि युद्धासाठी वापरले जाणारे काही प्रसिद्ध विमानांचे डिस्प्ले या संग्रहालयात दाखवली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com