esakal | आंबा घाटात दरड कोसळल्याने वाहतुक ठप्प
sakal

बोलून बातमी शोधा

Amba Ghat

रत्नागिरी: आंबा घाटात दरड कोसळल्याने वाहतुक ठप्प

sakal_logo
By
सुधीर काकडे

रत्नागिरी: दख्खन ता. संगमेश्वर येथे दरड कोसळली असल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रीय महामार्ग चे संबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत अशी माहिती तहसीलदार संगमेश्वर यांनी दिली आहे. रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील अंबाघाट येथे दरड कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. परतीचा पाऊस जोरदार सुरू असल्यामुळे ही दरड कोसळली आहे. पोलिसांनी वाहतूक थांबवली आहे. याठिकाणी जेसीबी पोहोचला असून काम सुरू केले आहे. मात्र पाऊस खूप असल्याने काम करताना अडथळा येत आहे.

हेही वाचा: चिपळूण : कुंभार्ली घाटात दरड कोसळली

सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने ही दरड हटवण्याचे काम सुरू आहे.मात्र किती वेळ लागेल हे अनिश्चित आहे. त्याचप्रमाणे अवजड वाहतूक बंद असताना आता सर्वच प्रकारची वाहतूक बंद झाली आहे.पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग ह्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.त्यामुळे वाहतूक केव्हा सुरू होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

loading image
go to top