Ratnagiri Alphonso Mango : दिवाळीत चाखायला मिळणार हापूस! रत्नागिरीतील गावखडीत ऑक्टोबरमध्येच आंब्याची पहिली पेटी तयार; 21 हजार रुपयांचा दर अपेक्षित

Early Hapus mango harvest in Ratnagiri : रत्नागिरीतील गावखडी येथे शेतकरी दत्ताराम पड्यार यांनी संरक्षित शेतीचा प्रयोग करून नियमित हंगामापूर्वीच हापूस आंब्याचे उत्पादन घेतले. पहिली चार डझनांची पेटी तयार झाली असून २१ हजारांचा दर अपेक्षित आहे.
Ratnagiri farmer success story

Ratnagiri farmer success story

esakal

Updated on: 

-सुधीर विश्वासराव

पावस : कोकणातील हापूस आंब्याचा नियमित हंगाम सुरू होण्यापूर्वीच हापूस आंब्याची चार डझनची पहिली पेटी तयार झाली आहे. गावखडी येथील प्रगतशील शेतकरी दत्ताराम बाजी पड्यार यांच्या बागेत हा प्रयोग यशस्वी झाला (First Hapus mango box before regular season) आहे. दिवाळीपर्यंत आणखी चार ते पाच पेट्या आंबा काढणीस तयार होणार आहे.

Loading content, please wait...