

Women members of Self Help Groups under the Lakhpati Didi Mission in Ratnagiri district.
sakal
रत्नागिरी : ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात मोठी प्रगती झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २५ हजार ८५६ महिला लखपती दीदी बनल्या असून, प्रशासनाने दिलेले उद्दिष्ट यशस्वीपणे ओलांडले आहे.