रत्नागिरीत विहिरीतील गायीला विद्यार्थ्यांकडून जीवदान 

Ratnagiri  Lives Given By Students To Cows
Ratnagiri Lives Given By Students To Cows
Updated on

 राजापूर (रत्नागिरी) : तालुक्‍यातील पाचल येथील मनोहर खापणे महाविद्यालयाच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी खोल विहिरीमध्ये पडलेल्या गायीला सुखरूपपणे बाहेर काढत जीवदान दिले. खापणे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दोन वर्षापूर्वी श्रमसंस्कार शिबिराच्यावेळी हरळ येथे श्रमदानातून विहीर खोदून गावकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविला होता. दरम्यान, त्यांनी आज गायीला जीवदान दिले. 

मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचे निवासी श्रमसंस्कार शिबिर रायपाटण येथे सुरू आहे. शिबिरातील नियोजित उपक्रमासाठी सकाळी विद्यार्थी निघाले होते. त्या वेळी रायपाटणचे सरपंच राजेश नलावडे यांनी श्रमसंस्कार शिबिराचे कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. एस. वाघमारे यांच्याशी संपर्क साधून टक्केवाडी येथील विहिरीमध्ये अडकलेल्या गायीला बाहेर काढण्यासाठी मदतीचे आवाहन केले.

खोल आणि अरुंद विहिरीतून वाचवला जीव

 नलावडे यांच्या आवाहनाची दखल घेऊन डॉ. वाघमारे यांनीही तातडीने विद्यार्थ्यांना घेऊन गाय पडलेल्या विहिरीकडे धाव घेतली. या वेळी त्यांना खोल आणि अरुंद असलेल्या विहिरीतील पाण्यातून बाहेर पडण्यासाठी गाय आटापिटा करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार वाघमारे यांनी काही निवडक विद्यार्थ्यांसमवेत विहिरीमध्ये उतरण्याचा तत्काळ निर्णय घेतला. गायीला बाहेर काढण्यासाठी सरपंच नलावडे यांच्यासह ग्रामस्थ विनायक निखार्गे, अनिल निखार्गे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

गायीला दोरखंडाने व्यवस्थित बांधून..
अरुंद आणि उंच असलेल्या विहिरीमधून गायीला बाहेर काढणे प्रत्यक्षदर्शी जिकिरीचे दिसत होते. मात्र, पाण्यामध्ये अडकून पडलेल्या गायीला बराच वेळ तशाच स्थितीमध्ये ठेवणेही धोकादायक ठरणारे होते. त्यामुळे वाघमारे यांनी दोन विद्यार्थ्यांनाही सोबत घेतले. गायीला दोरखंडाने व्यवस्थित बांधून तो दोरखंड विहिरीच्या काठावर असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी ओढण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे दोरखंड ओढून अरुंद विहिरीतून गायीला सुखरूपपणे बाहेर काढले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com