Ratnagiri Bridge Update : बार्जच्या धडकेनंतर म्हाप्रळ-आंबेत पुलाची स्थिती काय? अवजड वाहतूक बंद, मुंबई-पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना 60 किमीचा अतिरिक्त फेरा!

Mhapral Ambet Bridge latest update : बार्जच्या धडकेनंतर सुरू असलेल्या संरचनात्मक तपासणीमुळे म्हाप्रळ-आंबेत पूल अद्याप अवजड वाहनांसाठी बंद आहे. त्यामुळे मंडणगडमधील वाहतूक, व्यापार आणि गणेशोत्सवाच्या तयारीवर मोठा परिणाम होत आहे.
Mhapral Ambet Bridge latest update

Mhapral Ambet Bridge latest update 

esakal

Updated on

मंडणगड (रत्नागिरी) : बार्जच्या धडकेनंतर स्ट्रक्चरल ऑडिटसाठी (संरचनात्मक तपासणी) ६ जुलैपासून बंद केलेला म्हाप्रळ-आंबेत पूल २३ दिवस सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णक्षमतेने खुला झालेला (Ratnagiri bridge closure news today) नाही. सध्या या पुलावरून केवळ हलक्या चारचाकी वाहनांनाच परवानगी देण्यात आली असून, एसटी बस आणि इतर अवजड वाहनांवर बंदी कायम आहे. यामुळे मंडणगड तालुक्यातील जनजीवन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर मोठा विपरीत परिणाम झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com