Ratnagiri Free Ration: १८ हजार सधनांनी लाटले मोफत धान्य, मिशन सुधार अभियानात उघड; पडताळणीत ३७ हजार लाभार्थी अपात्र, शिधापत्रिका होणार रद्द

37,400 Ineligible Beneficiaries Found in Ratnagiri: रत्नागिरीत ‘मिशन सुधार’ अभियानाच्या पडताळणीत ३७ हजार ४०० अपात्र, मृत आणि दुबार लाभार्थी आढळले. यातील १८ हजार ८६० सधन लाभार्थी असून अपात्र शिधापत्रिका रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
Ratnagiri Free Ration

Ratnagiri Free Ration

esakal

Updated on

रत्नागिरी: उत्तम नोकरी आणि दरमहा मिळणारा चांगला पगार असतानाही गोरगरिबांच्या हक्काचे मोफत धान्य लाटण्याचा मोह काहींचा सुटलेला नाही; मात्र, अशा अपात्र लाभार्थ्यांविरोधात आता राज्य शासनाने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. ‘मिशन सुधार’ या विशेष अभियानांतर्गत जिल्ह्यात आधार डाटाबेस आणि शिधापत्रिकांच्या माहितीची संगणकीय पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत जिल्ह्यातील तब्बल ३७ हजार ४०० अपात्र, मृत आणि दुबार लाभार्थ्यांची यादी समोर आली आहे. यातील सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे, १८ हजार ८६० लाभार्थी हे सधन तसेच शासकीय किंवा खासगी क्षेत्रात चांगल्या पदावर नोकरी करणारे आढळले आहेत. त्यामुळे पुरवठा विभागाकडून या सर्व अपात्र लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका लवकरच रद्द केल्या जाणार आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com