Anti Snake Venom : सर्पदंशावरील अँटी-स्नेक व्हेनम इंजेक्शन्स केंद्रात उपलब्ध; आरोग्य विभागाचे सावधगिरीचे आवाहन, वेळेवर उपचार घेतल्यास वाचणार जीव!

Snakebite Cases Rise During Monsoon in Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात सर्पदंशाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने पाच हजार अँटी-स्नेक व्हेनम इंजेक्शन्सचा साठा उपलब्ध केला असून नागरिकांनी त्वरित शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन केले आहे.
snake bite treatment guideline

Ratnagiri monsoon snakebite prevention

esakal

Updated on

रत्नागिरी : आरोग्य विभागाने जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये सर्पदंशावरील सुमारे पाच हजार अँटी-स्नेक व्हेनम इंजेक्शन्सचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवला (Anti snake venom availability in Ratnagiri hospitals) आहे. त्यामुळे सर्पदंश झाल्यास तातडीने जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात उपचार घेतल्यास रुग्णाला वेळेत उपचार मिळू शकतात. पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com