रत्नागिरी पालिकेत एक प्रभाग वाढला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnagiri Municipality Ward structure announced 1 ward formed

रत्नागिरी पालिकेत एक प्रभाग वाढला

रत्नागिरी : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी रत्नागिरी पालिकेची प्रभाग रचना आज जाहीर केली. एक प्रभाग वाढल्यामुळे १५ एवजी १६ प्रभाग झाले आहेत. त्यानुसार ३० एेवजी ३२ वॉर्ड म्हणजे ३२ सदस्य संख्या झाली आहे. प्रभाग पाच आणि सहामधील काही भाग एकत्र करून १६ प्रभाग तयार केला आहे. यासाठी १८ मार्चपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या प्रभाग रचनेमध्ये प्रत्येक प्रभागात जास्तीत जास्त ५ हजार १३९, तर कमीत कमी ४ हजार ३७४ लोकसंख्या आहे. शहराची एकूण लोकसंख्या ७६ हजार २२९ आहे. त्यानुसार प्रभाग रचना जाहीर झाली आहे.

प्रभाग क्र. १ ची लोकसंख्या ४ हजार ९४४ असून या प्रभागात पालकर हॉस्पिटल आलिमवाडी, डी. एस.पी बंगला आंबेडकर वाडी, शहर पोलिस ठाणे, नवलाई मंदिर, गणपती मंदिर, पर्शुराम विद्यामंदिर हा भाग समाविष्ट आहे. प्रभाग क्र. २ मधील लोकसख्या ४ हजार ७१० असून यामध्ये वरचा फगरवठार, जिल्हा उद्योगकेंद्र , गवळीवाडी, सन्मित्रनगर, चोळीचा पऱ्या, के. सी. जैन नगर, हॉटेल विहार डिलक्स, देसाई हायस्कुल, शिर्के हायस्कूल.,

प्रभाग क्र. ३ ची लोकसंख्या ४ हजार ४३४ असून यामध्ये एकता मार्ग, संसारे उद्यान, कीर कंम्पाउंड, बाष्टे कंपाऊंड, अनंत सागर अपार्टमेंट, गव्हर्नर कॉटर्स, मिल्लत नगर, किस्मस बेकरी, चव्हाण कंपाउंड, स्टेट बॅंक कॉलनीचा काही भाग. प्रभाग क्र. ४, लोकसंख्या ४ हजार ४८१ यामध्ये स्टेट बॅंक कॉलनीचा काही भाग, नगरपालिका कॉलनी, राजनगर, कोकननगर, म्हाडा वसाहत फे १, २, ३, ४, कोकणनगर कब्रस्तान. प्रभाग क्र. ५- लोकसंख्या ४ हजार ३६४- यामध्ये क्रांतीनगर, साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्र झोपडपट्टी, छत्रपती नगर काही भाग, रमेश नगर, पार्से स्क्वेअर, जलतरण तलाव, ट्रक टर्मिनल कलारत्न अपार्टमेंट, गुलमोहर अपार्टमेंट.

प्रभाग क्र. ६- लोकसंख्या ४ हजार ४६६- यामध्ये हॉटेल व्यंकटेश, मारूती मंदिर, पार्से स्क्वेअर, छत्रपती शिवाजीनगर काही भाग, नवलाई नगर, आयटीआय अभ्यद्यनगर काही भाग, कर्लेकर कंम्पाउंड, साळगावकर कंपाउंड. प्रभाग क्र. ७- लोकसंख्या ४ हजार ४८५, यामध्ये हिंदू कॉलनी, कर्लेकर वाडी, दामले हायस्कूल, अभ्युद्यनगर काही भाग, आयटीआय मागील परिसर, सहकारनगर, नवलाई मंदिर परिसर, आंबेशेत, गणेश स्टॉप कर्ला, सुर्वे कंपाउंड कर्ला, राजिवडा, कब्रस्तान, जिजामाता उद्यान, आनंदनगर. प्रभाग क्र. ८- लोकसंख्या ५ हजार ०३१, यामध्ये प्रादेशिक मनोरुग्णालय, गांधी पेट्रोल पंप, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअम, हिंदु कॉलनी काही भाग, झापडेकर इमला, आकाशवाणी केंद्र, जिल्हाधिकारी निवास, हॉटेल लॅण्डमार्क, आदमपूर, निवखोल.

प्रभाग क्र. ९- लोकसंख्या ५ हजार १३९, यामध्ये गोखलेनाका, धनजीनाका, उर्दू शाळा, सिद्धीविनायक अपार्टमेंट, ओम अन्क्लेव्ह अपार्टमेंट, मेहत्तरचाळ, पोलिस हेडकॉटर्स उजविकडील घरे, मेन्टल हॉस्पिटल, सुपरीडेंन्ट यांचा इमला, श्रीराम मंदिर, मारूती देऊळ, प्रभाग क्र. १०, लोकसंख्या ४ हजार ९९५, यामध्ये शेरेनाका, श्री. खांडेकर यांचे घर, हेटपोस्ट ऑफिस, नवीन भाजी मार्केट, पऱ्याची आळी, टिळक आळी काही भाग, घाणेकर आळी, बंदर रोड, मुलीधर मंदिर.

प्रभाग क्र. ११, लोकसंख्या ४ हजार ९६८, यामध्ये झाडगाव झोपडपट्टी, झाडगाव गुरांचा दवाखाना, जोशी पाळंद, कलावती मंदिर, फाटक हायस्कुल, लक्ष्मी चौक, शेरेनाका उजवीबाजू, टिळक आळी गणपती मंदिर, टिळक आळी काही भाग, लघुउद्योग वसाहत, खालची आळी, भैरी मंदिर.

प्रभाग क्र. १२, लोकसंख्या ४ हजार ८९३. यामध्ये पंधरा माड, रेमंड रेस्टहाऊस, घसरवाट, पांढरा समुद्र नाका, मुरुगवाडा काही भाग, हंजर आईस फॅक्टरी, मुरुगवडा झोपडपट्टी, हार्बर, गेस्टहाऊस, मेरीटाईम बोर्ड,

प्रभाग क्र. १३, लोकसंख्या ४ हजार ६१८, यामध्ये मिरकरवाडा जेटी पोलिस चौकी, गद्रे मरिन, दांडा फिशरीज, मत्सोउद्योग वसाहत, कावळे नाका, शाळा, प्रभाग क्र. १४, लोकसंख्या ५ हजार ११३. यामध्ये भगवती मंदिर, भगवती बंदर, पठाणवाडी, खडप मोहल्ला सांब मंदिर, कुरणवाडी, भाटकरवाडा, सांब वाडी, लाईटहाऊस, मालुसरेघाटी, भग्येश्वर मंदिर, शाळा क्र. 9 दसपट वाडी, पाथरे बाग, नाना सुर्वे शाळा, मांडवी काही भाग, प्रभाग क्र. १५. लोकसंख्या ४ हजार ९६१, यामध्ये भडंग नाका, गांधी कॉलनी, पटवर्धन हायस्कूल, मारूती आळी काही भाग, एसटी स्टॅण्ड, कलेक्टर कंपाऊंड, खडपेवठार, चवंडेवठार, घुडेवठार, दत्त मंदिर पाटीलवाडी, प्रभाग क्र. १६ , लोकसंख्या ४ हजार ६२७, यामध्ये जयस्तंभ जावकर प्लाझा, पालिका कार्यालय, सिव्हिल हॉस्पिटल, लाला कॉम्प्लेक्स, गोगटे जोगळेकर कॉलेज, विश्वेश्वर घाटी उजवीकडील भाग, राजिवडा बंदर, टेक्निकल हायस्कुल, चक्री रस्ता याचा समावेश आहे.

एक नजर...

  • प्रत्येक प्रभागात जास्तीत जास्त लोकसंख्याः ५ हजार १३९

  • कमीत कमी लोकसंख्याः ४ हजार ३७४

  • शहराची एकूण लोकसंख्याः ७६ हजार २२९

Web Title: Ratnagiri Municipality Ward Structure Announced 1 Ward Formed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top