कोकण पदवीधर मतदारसंघातून अनेक इच्छुक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

चिपळूण -  विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी या निवडणुकीत उमेदवार देण्याची शक्‍यता आहे. या मतदारसंघात सर्वाधिक मतदार ठाणे जिल्ह्यातील, तर सर्वांत कमी मतदार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील उमेदवार देण्यावर सर्वपक्षीयांचा भर आहे. 

पदवीधर मतदारसंघाचे निरंजन डावखरे आमदार आहेत, त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला असून, भाजपने डावखरे यांना उमेदवारी जाहीर केली. गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू या मतदारसंघातून भाजपतर्फे इच्छुक होते. डावखरे भाजपत गेल्यामुळे राष्ट्रवादीकडून ठाण्यातील ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांचे नाव पुढे आले आहे.

उच्चशिक्षित मुल्ला हे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांचेही ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत. कोकण शिक्षक मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीने शेकापला सोडली होती. ही जागा राष्ट्रवादीने शेकापसाठी सोडल्यास शेकाप नेते जयंत पाटील यांच्या सून चित्रलेखा पाटील या रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेकडून ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांचे नाव चर्चेत आहे. शिवसेनेने उमेदवार उभा केल्यास निवडणूक चुरशीची होण्याची शक्‍यता आहे.  

राणे, ठाकूर यांना महत्त्व  
कोकण पदवीधर मतदारसंघात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. या निवडणुकीत नारायण राणे, हितेंद्र ठाकूर यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. ते कोणाला पाठिंबा देतात, त्यावरही बरीच समीकरणे अवलंबून आहेत.

Web Title: Ratnagiri News Konkan Graduate Legislative Council election