रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येतील वाढ कायम
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी (ता. 16) सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालात आणखी 14 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 445 झाली आहे. दिवसभरात 19 जण कोरोनामुक्त झाले. त्यांना घरी सोडण्यात आले. आत्तापर्यंत 17 मृत्यू झाले असून सध्या उपचार घेणाऱ्यांची संख्या 108 आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही चांगली आहे. दिवसभरात कोविड केअर सेंटर सामाजिक न्याय भवन येथील चार आणि जिल्हा शासकीय रुग्णालय येथील तीन, कोविड केअर सेंटर साडवली येथील दहा, कोविड केअर सेंटर घरडा लोटे येथील दोन रुग्णांना घरी सोडण्यात आले. सायंकाळपर्यंत सापडेलेल्या 14 रुग्णांमध्ये दापोली व रत्नागिरी प्रत्येकी तीन आणि चिपळूण-कामथे येथील आठ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कन्टेंन्मेन्ट झोनसंख्या आता केवळ 30 आहे. होम क्वारंटाईनखाली असणाऱ्यांची संख्या 44 हजार 731 आहे. आत्तापर्यंत सहा हजार 944 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्हा रुग्णालयामार्फत 7 हजार 748 नमुने तपासण्यात आले असून पैकी 7 हजार 410 तपासणी अहवाल मिळाले. त्यातील 445 पॉझिटिव्ह असून सहा हजार 944 निगेटिव्ह आहेत. अजून 338 नमुन्यांचा अहवाल आलेला नाही. इतर जिल्ह्यातून आलेले आणि होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या 44 हजार 731 इतकी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.