MSEDCL electricity bill arrears in Ratnagiri district
esakal
रत्नागिरी : जिल्ह्यात जाणवू लागलेल्या ‘ऑक्टोबर हीट’चा थेट परिणाम महावितरणच्या वीजपुरवठा आणि मागणीवर झाला आहे. उकाड्यामुळे पंखे, एसी आणि कुलरचा वापर वाढल्याने एरवी नियमित १६० मेगावॉट असणारी विजेची मागणी तब्बल २० मेगावॉटने वाढून १८० मेगावॉटवर पोहोचली (MSEDCL electricity bill arrears in Ratnagiri district) आहे. मागणीत अचानक झालेल्या वाढीसोबतच जिल्ह्यात सुमारे ३८ कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी असल्याचे महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी सांगितले.