रत्नागिरी : आई-वडिलांसह मुलगा बारावी उत्तीर्ण; आनंद अवर्णनीय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आई, वडील व मुलगा एकाच वेळी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

रत्नागिरी : आई-वडिलांसह मुलगा बारावी उत्तीर्ण; आनंद अवर्णनीय

रत्नागिरी : तालुक्यातील हातखंबा येथे आई, वडील व मुलगा एकाच वेळी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल, शिक्षणाच्या तळमळीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यश मिळवण्यासाठी वयाचे बंधन नाही तर जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी हवी असे म्हटले जाते, ते पती, पत्नीने खरे करून दाखवले. शिक्षण किती महत्वाचे आहे, हे या कुटुंबाने खरे करून दाखवले आहे. रोहित राजन कांबळे हा मुलगा, राजन कांबळे हे वडील अन रुचिता कांबळे यांनी हे यश मिळवले.

हातखंबा-बौद्धवाडीतील रोहित राजन कांबळे याला विज्ञान शाखेतून ५२ टक्के गुण मिळाले. त्याचे वडील राजन कांबळे यांना कला शाखेतून ५४ टक्के तर आई रुचिता यांना कला शाखेतून ५६ टक्के गुण मिळाले. कांबळे कुटुंबातील तिघांनी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत यश संपादन केले आहे. या एकाच कुटुंबातील तिघांनी बारावी परीक्षेत यश संपादन करून इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे. राजन कांबळे (४५) व रोहित कांबळे (१९) अशी या दोघा पिता-पुत्राची नावे आहेत. रुचिता कांबळे (४२) असे आईचे नाव आहे. राजन कांबळे यांनी वयाच्या ४५ व्या वर्षी परीक्षा दिली.

वडिलांची इच्छा पत्नीने केली पूर्ण

या यशानंतर राजन कांबळे म्हणाले, लग्नापूर्वी पत्नीचा बारावीमध्ये एक विषय राहून गेला होता. तिच्या शिक्षणाविषयी माझ्या वडिलांची इच्छा होती की, सुनेने बारावीची पुन्हा परीक्षा देऊन यश मिळवावे. हीच वडिलांची इच्छा मनी बाळगून तिने मलाही बारावी परीक्षा देण्यासाठी आग्रह केला. यातून आम्ही दोघेही बारावी उत्तीर्ण झालो. या यशामागे आईची साथ दडलेली आहे. तसेच ऑनलाईन, ऑफलाईन अभ्यासासाठी आम्हा दोघांना बारावीत असणाऱ्या मुलाने ही उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. आज आम्ही दोघेही बारावी उत्तीर्ण झालो. माझ्या वडिलांची इच्छा पत्नीने पूर्ण केली आहे. याचा खूप आनंद वाटतोय.

मिळालेले गुण असे

रोहित कांबळे याला विज्ञान शाखेतून ५२ टक्के

वडील राजन कांबळे यांना कला शाखेतून ५४ टक्के

आई रुचिता यांना कला शाखेतून ५६ टक्के

Web Title: Ratnagiri Parents Passed 12th Happiness Indescribable

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top