
रत्नागिरी : शहरात गांजा विक्री व सेवन करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली आहे. दोन दिवसांत शहरातील जेलरोड, कोकणनगर आणि शिरगाव येथे गांजासदृश अमली पदार्थ सेवन करणाऱ्या चौघांना अटक केली. पोलिसांच्या या कारवाईने गांजा विक्री सेवन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नुरमहोम्मद दिलमोहम्मद खान (वय २४), किरण रामंचद्र कदम (२२), शब्बीरअली शहनवाझ पटेल (२८) आणि शफाकत हसन आदम राजपकर (३६) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी (ता. १८) रात्री नऊच्या सुमारास शहरातील जेलरोड, कोकणनगर, शिरगाव-शेट्येवाडी या ठिकाणी निदर्शनास आली.