कांदे, बटाटे विकणार्‍याने सांगितले शिकार करायला अन्...

ratnagiri police read on huntsman home
ratnagiri police read on huntsman home

दाभोळ : दापोली येथील वनविभागाच्या अधिकार्‍यांनी तालुक्यातील करंजाळी बालगुडेवाडी येथील कल्पेश बालगुडे याच्या घरावर छापा मारून 1 लाख 25 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये कासवाच्या पाठीचे कवच, खवले, जंगली ससा याचा समावेश आहे.

याबाबत वनाधिकारी यांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी कल्पेश बालगुडे याच्या घरावर 7 मे रोजी छापा टाकला. वनविभागाच्या कर्मचार्‍यांना बालगुडे याच्या घरी 1 कासवाच्या पाठीचे कवच, पिंजर्‍यात ठेवलेला 1 जिवंत जंगली ससा, 2 किलो 200 ग्रॅम वजनाचे खवले मांजराचे खवले, खवले मांजराचा फेरबदल केलेला 1 पंजा असा 1 लाख 25 हजाराचा ऐवज मिळाला असून तो पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे.  

या संदर्भात संशयित कल्पेश बालगुडे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर वन्यप्राण्यांची शिकार करणे, वन्यप्राण्यांचे अवयव व जिवंत वन्यप्राणी बाळगणे, वन्यप्राणी यांच्या मांसाची विल्हेवाट लावणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत दापोलीचे वनपाल खेडेकर, खेडचे वनपाल अनिल दळवी, वनरक्षक गणपती जळणे, महादेव पाटील, सूरज जगताप, सुरेखा जगदाळे, राजाराम पाटील आदी सहभागी झाले होते.


कांदे, बटाटे विकणार्‍याने सांगितले शिकार करायला 

गावात एक-दीड महिन्यांनी कांदे, बटाटे विकण्यासाठी येणार्‍या एका इसमाने आपल्याला खवले मांजराची शिकार करण्यास सांगितले होते. तसेच शिकार करून खवले कसे काढायचे हेही सांगितले असल्याचे संशयित बालगुडे याने चौकशीत सांगितले असल्याची माहिती परिक्षेत्र वनाधिकारी वैभव बोराटे यांनी दिली.

रत्नागिरी  रत्नागिरी  रत्नागिरी  रत्नागिरी  रत्नागिरी  रत्नागिरी  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com