
Ratnagiri Rain Update : रविवारी रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले असून, जनजीवन विस्कळीत झाले. पावसाने संगमेश्वरमध्ये हाहाकार उडवून दिला. शास्त्री नदीच्या पुराच्या पाण्यामुळे रामपेठ बाजारपेठ जलमय झाली, तर कुचांबे-कोंडभैरव येथे घरावर दरड कोसळल्याने तीन कुटुंबीयांचे स्थलांतर करावे लागले. गोळवलीत भूस्खलन झाल्याने ताम्हणकोंड येथील वहाळाला नदीचे रूप आले होते. त्यामुळे शेती-बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे.