

Ratnagiri Rainfall 2026
esakal
रत्नागिरी: जिल्ह्यात यंदा ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत सरासरी ६५० मिलिमीटर कमी नोंद झाली आहे. यंदा आतापर्यंत ७० टक्के पाऊस झाला असून, गतवर्षी ८९.७७ टक्के पाऊस झालेला होता. सुमारे १० टक्के कमी पाऊस झाला. सुदैवाने, जिल्ह्यातील सर्व लहान-मोठ्या पाटबंधारे प्रकल्पांमध्ये मिळून ७८.४० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. ५९ प्रकल्पांमध्ये ३६९.२९ दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणीसाठा असून ५० लघुपाटबंधारे पूर्ण क्षमतेने ओव्हरफ्लो झाले आहेत. सरासरीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस असला तरीही पाटबंधारे प्रकल्पात पुरेस पाणी आहे.