Ancient Inscription Discovered at Kashi Kund in Unhale
esakal
राजापूर (रत्नागिरी) : तालुक्यातील उन्हाळे तीर्थक्षेत्री असलेल्या गंगामाईच्या ठिकाणी असलेल्या चौदा कुंडांपैकी काशीकुंडामध्ये प्राचीन शिलालेख आढळून आला आहे. त्या शिलालेखावर ‘चरण रज भास्कर काशी जोशी सोमेश्वरकर’ अशी अक्षरे कोरलेली आहेत. हा शिलालेख नेमक्या कोणत्या कालावधीमध्ये आणि कोणी कोरला आहे, याबाबत कोणताही उल्लेख आढळून येत नाही.