Fishing boat trapped in creek Ratnagiri
esakal
रत्नागिरी : शहराजवळील राजीवडा खाडी मुखाशी मच्छीमारांना जीव मुठीत घेऊन नौका ने-आण करावी लागत आहे. तांडेलला पाण्याचा अंदाज न आल्याने राजिवड्यातील मच्छीमारी नौका बुधवारी (ता. २७) खाडी मुखातील गाळामध्ये (Ratnagiri Rajivada creek fishing boat incident) अडकली. सकाळी अडकलेली ही नौका दुपारी समुद्राच्या भरतीच्या लाटांमुळे निघाली. त्यामुळे चार तास या मच्छीमारांचा जीव टांगणीला लागला होता. त्यामुळे मंजूर झालेल्या कामातून या खाडीमुखातील गाळ लवकरात लवकर काढून मच्छीमारांना ये-जा करण्यासाठी सुरक्षित मार्ग तयार करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.