esakal | राजापुरात अर्जुना, कोदवली नद्यांचा शहराला वेढा ; व्यापार्‍यांना सतर्कततेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

राजापुरात अर्जुना, कोदवली नद्यांचा शहराला वेढा

राजापुरात अर्जुना, कोदवली नद्यांचा शहराला वेढा

sakal_logo
By
राजेंद्र बाईत

रत्नागिरी : पावसामध्ये अर्जुना आणि कोदवली (Arjuna and Kodavali Revier) नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याने यावर्षी दुसर्‍यांदा शहराला वेढा घातला आहे. काल रात्री उशीरा जवाहर चौकामध्ये (Jawahar Chowka) धडक देणार्‍या पुराच्या पाण्याने आज सकाळपर्यंत ठिय्या मांडला आहे. जवाहर चौकात पुराच्या पाण्याचा सुमारे सात तासाहून अधिक काळ शहराला वेढा राहीला आहे. सतंतधारा पावसाने पुरस्थितीमध्ये वाढ होत असून शहरासह तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाढत्या पुराच्या पाण्याने व्यापार्‍यांची मात्र, त्रेधातिरपीट उडविली आहे.  

शहरातील बंदरधक्का, मुन्शीनाका परिसर, वरचीपेठ परिसर, शिवाजीपथ आदी भाग पूराच्या पाण्याखाली आहे. तर, शहरालगतचा शीळ, गोठणेदोनिवडे-चिखलगाव आदी गावांचा संपर्क तुटला आहे. तर, उन्हाळे, दोनिवडे पंचक्रोशीतील गावांना जोडणारा रस्ताही पाण्याखाली गेल्याने त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नद्यांच्या काठावरील भातशेती पाण्याखाली गेली आहे. दरम्यान, नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, तहसिलदार प्रतिभा वराळे आदींनी शहरातील पुरस्थितीची पाहणी करून लोकांसह व्यापार्‍यांना सतर्कततेचा इशारा दिला आहे.ratnagiri-red-alert-rajapur-rain-update-kokan-news

गेले दोन दिवस तालुक्यामध्ये सततधारा पाऊस पडत आहे. त्यातून, अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊन शहरामध्ये पूर आला. त्यामध्ये शहरातील शिवाजीपथ रस्त्यासह बंदरधक्का, मुन्शी नाका, वरचीपेठ परिसरासह कोदवली नदीच्या काठावरील टपर्‍या काल सायंकाळी पाण्याखाली गेल्या मात्र, पावसाचा जोर कायम होता. अशातच रात्री पूराच्या वाढलेल्या पाण्याने शहराला वेढा घालताना थेट जवाहरचौकामध्ये धडक दिली. त्यामध्ये सुमारे अडीच ते तीन फूट उंचीचे पाणी जवाहर चौकात साठलेल्या पूराच्या पाण्याचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत धडक दिली. त्यातून नदीच्या पलिकडील लोकवस्तीचा शहरातील अलीकडील लोकवस्तीशी संपर्क तुटला.

हेही वाचा- आज फैसला; वर्णी कोणाची?सत्ताधारी ,विरोधक उमेदवारांची नावे गुलदस्त्यात

शिवाजी पथ रस्त्यावरील अनेक दुकानांमध्ये पुराचे पाणी घुसले. बाजारपेठेतील अनेक दुकानंमध्ये पूराचे पाणी घुसले आहे. पूराच्या पाण्याचा वेग आणि पातळी सातत्याने वाढत असल्याने सावध झालेल्या व्यापार्‍यांनी दुकानामध्ये पाणी घुसण्याच्या शक्यतेने तातडीने दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी रात्रीच हलविला. त्यामुळे व्यापार्‍यांचे फारसे नुकसान झालेले नाही. जवाहर चौकात घुसलेल्या पाण्याचा हा ठिय्या आज सकाळपर्यंत कायम होता. शहरानजीकच्या शीळ, गोठणेदोनिवडे, उन्हाळे, दोनिवडे, चिखलगाव, पन्हळेतर्फ राजापूर, गोवळ, शिवणे आदी गावांमधील भातशेती आणि गावांना जोडणारे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या गावांमधीलही जनजीवन विस्कळीत झाले आहे.

loading image