esakal | आज फैसला; वर्णी कोणाची? सत्ताधारी ,विरोधक उमेदवारांची नावे गुलदस्त्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Voting

आज फैसला; वर्णी कोणाची? नाव गुलदस्त्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या (z p president,vice presiden election 2021) अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज होणार आहे. मात्र सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही अद्याप आपल्या उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या नाट्यमय घडामोडींमुळे ही निवडणुकीची उस्तुकता शिगेला पोहचली आहे. अध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून राहुल पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. आज (ता. १२) दुपारी २ वाजता जिल्हा परिषदेच्या सभेमध्ये मतदान होऊन त्यानंतर निवड केली जाणार आहे.

महाविकास आघाडीतील प्रत्यक पक्षाच्या सदस्यांना मिळणारे पदे, आगामी विधान परिषद आणि जिल्हा बँकेची निवडणूक या दृष्‍टिकोनातून जिल्हा परिषदेची निवडणूक महत्त्‍वाची मानली जात आहे. यामध्ये भाजप-ताराराणी आघाडीकडे २३ सदस्य तर महाविकास आघाडीकडे ४२ सदस्य आहेत. सुरुवातीला अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून दावा करण्यात आला होता. त्यांच्या युवराज पाटील यांचे नाव निश्चित मानले जात होते. मात्र आमदार पी.एन.पाटील यांनी राहुल पाटील यांच्यासाठी जोर लावला. त्यानंतर राहुल यांचे नाव आघाडीवर आले. मात्र अद्याप महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारीचे नाव जाहीर केलेले नाही.

हेही वाचा- सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; दुर्गाबाईंनी दिला निपाणकरांना शह

उपाध्यक्षपद राष्ट्रवादीलाच मिळेल अशी शक्यता आहे. भाजप-ताराराणी आघाडीकडून अद्याप कोणत्याच उमेदवाराचे नाव घोषित करण्यात आलेले नाही. आज (ता. १२) सकाळी १० वाजता सत्ताधारी आणि विरोधक आपली भूमिका आणि उमेदवारांची नावे जाहीर करणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजता होणाऱ्या सभेत मतदानाची प्रक्रिया पार पडेल.

loading image