esakal | मेर्वीत 'त्याची' पुन्हा दहशत ; चतुराईने वन खाते हैराण 
sakal

बोलून बातमी शोधा

in ratnagiri Rescue team against Forest Department will change strategy

वन विभाग स्ट्रॅटेजी बदलणार; पुन्हा रेस्क्‍यू टीम

मेर्वीत 'त्याची' पुन्हा दहशत ; चतुराईने वन खाते हैराण 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पावस-रत्नागिरी : रेस्क्‍यू पथकाला आठ दिवस हुलकावणी देणाऱ्या बिबट्याने पथक माघारी गेल्यावर सोमवारी  १४ रोजी रात्री पुन्हा मेर्वी येथे तिघांवर हल्ला केला. त्यामुळे परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वन विभागाने तत्काळ पावले उचलली आहेत. त्या भागात गस्तीसाठी कायमस्वरूपी वनविभाग खोली बांधणार आहे. ज्या भागात हल्ले होत आहेत, तेथे लाइट लावून दाट झाडी व गवत कापणार आहे. तसे निवेदन वनविभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. रेस्क्‍यू टीम पुन्हा बोलविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. 


पावस, मेर्वी या परिसरात सागरी मार्गावर गेली दोन वर्षे सातत्याने बिबट्याचे हल्ले होताहेत. हल्ले झाल्यानंतर तातडीने वनविभागाला कळविले जाते. जखमींवर उपचार करून त्याला काही प्रमाणात अर्थसाहाय्य दिले जाते. काही दिवस त्या परिसरात वनविभागातर्फे गस्त घातली जाते. बिबट्या आपला मार्ग बदलून गावदरीतून भ्रमण करीत असताना दिसतो; मात्र रेस्क्‍यू टीमचे कॅमेरे व पिंजरे लावला की बिबट्या कुठेच दिसत नाही. त्याम्‌ुळे त्याला पकडण्यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने भीतीचे वातावरण आहे. 


हेही वाचा- ...तर कार्यालयाच्या काचा फुटतील! मनसेचे कार्यकर्ते झाले आक्रमक -


काल झालेल्या हल्ल्यात दोघांना पावस प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार करून घरी पाठवले. त्यात पायल खर्डे यांच्या हातामध्ये छोटेसे बाळ होते. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. पुन्हा वन विभागाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. रात्री त्या ठिकाणी विजेची सोय करून बाधित क्षेत्र संरक्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. लवकरच परिसरातील सरपंच व पोलिसपाटील यांची संयुक्त बैठक घेऊन यावर कायमस्वरूपी उपाययोजना होणार आहे, असे मेर्वीचे सरपंच शशिकांत म्हादये यांनी सांगितले.

हेही वाचा- सर्व्हैक्षणासाठी गृहभेटींवर भर, स्पर्धात्मक उपक्रमही, पहिला टप्पा झाला सुरू -

चतुराईने वन खाते हैराण 
रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड म्हणाल्या, आठ दिवस बिबट्याला पकडण्यासाठी एक मुंबईची टीम होती. टीम गेल्यावर लगेच त्याने दुचाकीस्वारांवर हल्ला केला. आम्हीदेखील बिबट्याच्या या चतुराईने हैराण आहोत. या भागात आम्ही गस्त घालण्यासाठी कायमस्वरूपी खोली बांधणार आहोत. त्यामध्ये तीन कर्मचारी आळीपाळीने कार्यरत राहातील. मोठे फलक लावून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले जाईल.

संपादन -  अर्चना बनगे

loading image