esakal | Ratnagiri : पोलिस अधीक्षकांकडून बंदोबस्ताचा आढावा
sakal

बोलून बातमी शोधा

ratnagiri

Ratnagiri : पोलिस अधीक्षकांकडून बंदोबस्ताचा आढावा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिस बंदोबस्त तसेच कोरोना खबरदारीबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी या बंदोबस्ताचा गुरुवारी आढावा घेतला. त्यांनी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर जाऊन तेथील कामाची पाहणी केली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने चाकरमानी गावामध्ये दाखल होत आहेत. कोरोनाचे संकट कायम असल्याने केवळ कायदा आणि सुव्यवस्थाच नाही तर कोरोनाची खबरदारी घेणेही आवश्यक झाले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनबरोबरच आरोग्य विभाग आणि पोलिस विभागही सज्ज झाले आहे.

पोलिस विभागाकडून महामार्गावर आणि रेल्वे स्थानकावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बंदोबस्ताची डॉ. गर्ग यांनी पाहणी केली. पाहणीत रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही सुरू आहेत का, याची माहिती घेतली. कोरोना चाचणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला तसेच पार्किंग व्यवस्था, एसटी बसेस, येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांच्या मार्गाचीही पाहणी केली.

loading image
go to top