रत्नागिरी : समुद्र खवळला; मासेमारीत अडथळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इम्रान मुकादम, मच्छीमार

रत्नागिरी : समुद्र खवळला; मासेमारीत अडथळा

रत्नागिरी : ‘असनी’ चक्रीवादळामुळे समुद्र खवळला असून त्याचा मासेमारीवर परिणाम झाला आहे. मोजक्याच नौका मासेमारीसाठी जात असल्याने मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. एक किलो सुरमईसाठी नागरिकांना नऊशे रुपये मोजावे लागत आहेत. वादळाचा परिणाम अजून दोन राहण्याची शक्यता वर्तविली जाते.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे त्या किनारपट्टीवर असनी चक्रीवादळ तयार झाले आहे. त्यामुळे खोल समुद्रातील वातावरण बिघडले असून उंचच उंच लाटा निर्माण होत आहे. परिणामी मच्छीमारांनी खोल समुद्रात जाणे टाळले आहे. गेले दोन ही परिस्थिती आहे. अरबी समुद्रातही त्या वादळाचा प्रभाव जाणवत असून पाण्याला प्रचंड करंट आहे. हवामान विभागाकडून मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार अनेक मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीला जाणे टाळले. मिरकरवाडासह छोट्या-मोठ्या बंदरावर मासळी आवक घटली.

मिरकरवाडा येथे दर दिवशी लाखो रुपयांची उलाढाल होते. गेल्या दोन दिवसांत मासळीच कमी असल्याने दरही वधारले आहेत. एक किलो सुरमई ६०० रुपयांवरुन ९०० रुपयांवर गेली आहे. ९०० रुपये किलो पापलेट आता १२०० ते १५०० रुपयांनी मिळत आहे. शंभर रुपयांमध्ये मिळणाऱ्‍या सहा बांगड्यांना २५० रुपये मोजावे लागत आहे. अन्य प्रकारच्या मासळीचेही दरही वाढले आहेत.

असनी वादळामुळे वातावरण बदलले आहे. त्यामुळे बहुसंख्य नौका बंदरातच उभ्या असल्याचे चित्र दिसत आहे. समुद्र खवळल्यामुळे मासे स्थलांतरित होतात. या कालावधीत मासळी मिळत नाही, अशी सद्य परिस्थिती आहे.

- इम्रान मुकादम, मच्छीमार

Web Title: Ratnagiri Rough Obstaclefishing Tourists

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top