
रत्नागिरी : दापोलीतील कामांसाठी साडेतीन कोटी मंजूर
दाभोळ: दापोली व मंडणगड नगरपंचायत व खेड नगरपालिका क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत १० कोटींचा निधी आपल्या प्रयत्नाने नगरविकास विभागाकडून मंजूर केला असल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली.दापोली शहरातील कोकंबा आळीतील गद्रे पुलानजीकच्या मारुतीमंदिर नाल्याचे खोलीकरण करणे व तो मोकळा करणे या कामासाठी २ कोटी रुपये मंजूर झाले असून, शिवाजीनगर प्रभागातील लाल कट्टा ते वालावलकर घरदरम्यान असलेल्या नाल्याचे खोलीकरण करणे व अन्य कामासाठी कोटी ५० लाख असा दापोली शहरासाठी ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी आपण सुचवलेल्या कामांसाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केला.
ही दोन्ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करणार असल्याचेही आमदार योगेश कदम यांनी सांगितले. पाणंद योजनेंतर्गत २०२२ -२०२३ या वर्षाच्या आराखड्यालाही मंजुरी मिळाली असून, दापोली विधानसभा मतदार संघातील ५० कि.मी. रस्त्याची कामे या योजनेतून मंजूर झाली आहेत. या योजनेतून १०० कि.मी. रस्त्याची कामे सूचवली होती. त्यातील ५० कि.मी.ची कामे पहिल्या टप्य्यात मंजूर झाली असून, उर्वरित कामे दुसऱ्या टप्य्यात होणार आहेत. यात दापोली तालुक्यातील सोंडेघर आवाशी मुख्य रस्ता ते आपटी भैरीमंदिर ते लक्ष्मी तांबे यांच्या शेतापर्यंत रस्ता टांगर पाटीलवाडी ते प्रकाश भोसले यांच्या शेतापर्यंत रस्ता शिरखल हातीप वडवली मुख्य रस्ता ते वामन शेडगे यांच्या दापोली मळे सुतारवाडी रस्त्यापासून सुनील भोसले यांच्या कुंभवे मुख्य रस्ता ते देवजी शिवगण यांच्या ताडील सुरेवाडी वरचीवाडी रस्ता ते राजेश रहाटवळ तेरेवायंगणी गणेशमंदिर ते चंद्रकांत शिवगण यांच्या तेरेवायंगणी मुख्य रस्ता ते नारायण कावणकर यांच्या देगाव मुख्य रस्ता ते प्रभाकर गोलांबडे यांच्या शेतापर्यंत रुखी अंगणवाडी ते रामचंद्र मांडवकर यांच्या शेतापर्यंत रस्ता करणे, अशी दापोली तालुक्यातील २४ कामे मंजूर आहेत.
एक नजर..
पाणंद योजनेतून रस्त्याची कामे सुचवली १०० कि.मी.
त्यातील कामे पहिल्या टप्य्यात मंजूर ५० कि.मी.
दापोली तालुक्यातील कामे मंजूर संख्या २४
Web Title: Ratnagiri Sanctioned Works Dapoli
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..