Ratnagiri Farmers Compensation Delay : संगमेश्वर तालुक्यातील 60 टक्के शेतकरी मदतीपासून वंचित राहणार? महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, उपसभापती बाईत आक्रमक

Ratnagiri farmers compensation delay : संगमेश्वर तालुक्यात अवकाळी पावसामुळे आंबा व काजू उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. भरपाईसाठीची यादी महसूल विभागाकडून वेळेत अपलोड न झाल्याने सुमारे ६० टक्के शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
Konkan cashew farmers government compensation

Konkan cashew farmers government compensation

esakal

Updated on

देवरूख : संगमेश्वर तालुक्यात यंदा आंबा व काजू पिकांचे अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदलांमुळे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय भरपाई मिळण्यात महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे मोठा अडथळा निर्माण झाला (Sangameshwar mango crop loss compensation) आहे. तालुक्यातील सुमारे दोन हजार बाधित शेतकऱ्यांची यादी पंचायत समितीने जून महिन्यातच तयार करून ऑनलाईन अपलोडसाठी तहसील कार्यालयाकडे पाठवली होती; मात्र जुलै महिना संपत आला, तरी अद्याप केवळ ४० टक्केच यादी प्रणालीवर अपलोड झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com