Sangameshwar rainfall deficit 35 percent
esakal
देवरूख : संगमेश्वर तालुक्यासमोर टंचाईचे गंभीर संकट उभे राहण्याची शक्यता आहे. तालुक्यातील सरासरी पर्जन्यमानात ३५ टक्के घट झाली आहे. १६५ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली (Ratnagiri water scarcity 2026) आहे. याला सामोरे जाण्यासाठी संगमेश्वर तालुक्याचा २६ कोटी ६४ लाख रुपयांच्या विविध उपाययोजनांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे.