रत्नागिरी : सर्व्हर डाउनमुळे रेशनचे ग्राहक गेले वैतागून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnagiri Ration card customers

रत्नागिरी : सर्व्हर डाउनमुळे रेशनचे ग्राहक गेले वैतागून

लांजा : रेशन धान्य वितरण व्यवस्थेत वापरण्यात येत असलेल्या ई पॉस मशिनचा सर्व्हर वारंवार डाउन होत असल्याने लोकांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. लांजा येथील रेशनवर धान्य उपलब्ध आहे. मात्र, सर्व्हर डाऊनमुळे रेशन वेळेवर मिळत नाही. यामुळे गोरगरीब लोकांना धान्य वेळेत मिळत नसल्याने लोक हैराण झाले आहेत.

स्वस्त धान्य दुकानामार्फत होणाऱ्या रेशन धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता यावी, या हेतूने राज्यभरात ई-पॉस या बायोमेट्रिक प्रणालीचा वापर सुरू झाला आहे. परंतु ई-पॉस मशिनचा सर्व्हर वारंवार डाऊन होत आहे. तसेच स्लो नेटवर्कमुळे लिंक फेल होऊन रेशन वितरणात अडचणी येत आहेत. परिणामी लाभार्थ्यांसह स्वस्त धान्य दुकानदारही त्रस्त झाले आहेत.

रेशन धान्य वितरण व्यवस्थेत वापरण्यात येत असलेल्या ई-पॉस मशिनमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे शिधावाटप दुकानात धान्य असूनही ते मिळत नसल्याचे समोर आले आहे. रोजंदारीवर जाणाऱ्या नागरिकांना कामाचा खाडा करून गेली तीन ते चार दिवसांपासून संपूर्ण दिवस रेशन दुकानासमोर घालवावा लागत असल्याने नागरिक वैतागलेले आहेत.

दोन ग्राहकांसाठी एक ते दीड तासाचा वेळ..

गेल्या तीन चार महिन्यांपासून सातत्याने ई-पॉस मशिनचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे रेशन वितरणाचे काम अत्यल्प वेळ चालत आहे. एका दुकानदाराला दिवसभरात एक ते दोन ग्राहक करण्यासाठी एक ते दीड तासाचा वेळ लागतो. परिणामी दुकानासमोर लाभार्थ्यांची गर्दी होत असते.

Web Title: Ratnagiri Server Down Ration Card Customers Shopkeepers Grain Distribution Beneficiaries

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..