''खासदारांच्या कौतुकामुळे शिवसैनिकांची मान उंचावली'' 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 March 2021

खासदार राऊत यांच्यावर कोणीतरी टीका करावी आणि आम्ही गप्प रहावे, अशी जर समजुत कोणाची असेल तर ती चुकीची असेल.

कुडाळ - खासदार विनायक राऊत यांच्यावर काही तुरळक विरोधक टीका करतात; परंतु खासदार विनायक राऊत यांनी या लोकसभा मतदार संघाचा बॅ. नाथ पै व प्रा. मधु दंडवते यांचा आदर्श वारसा चालु ठेवल्याने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला खासदार विनायक राऊत यांची लोकप्रियता असल्यानेच कौतुक केले. या कौतुकाने आम्हा शिवसैनिकांची मान उंचावली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना पदाधिकारी अतुल बंगे यांनी व्यक्त केली.

श्री. बंगे म्हणाले, ""खासदार राऊत यांच्यावर कोणीतरी टीका करावी आणि आम्ही गप्प रहावे, अशी जर समजुत कोणाची असेल तर ती चुकीची असेल. कारण आम्हा शिवसैनिकांना खासदार राऊत यांची शिकवण आहे. आपण टीकेला उत्तर लोकांची कामे करुन दिली पाहीजेत. त्यामुळे आपली लोकप्रियता कमी होत नाही. म्हणूनच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाखाली आलेल्या चिपी एअरपोर्ट कमिटीच्या खासदारांनी खासदार राऊत यांचे भरभरून कौतुक केले आहे. खासदार राऊत यांचे काम आम्हा शिवसैनिकांना प्रोत्साहनात्मक असते.

आज या लोकसभा मतदारसंघाला बॅ. नाथ पै, प्रा. मधु दंडवते यांचा वारसा लाभला तोच वारसा खासदार राऊत चालवत असून तोंडामध्ये आणि वागण्यामध्ये साजेशे गुण आणि संस्कार खासदार राऊत यांच्याजवळ आहेत. याचा आम्हा शिवसैनिकांना सार्थ अभिमान आहे.''
 
   संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ratnagiri shiv sena atul bage