रत्नागिरी : एसटी बंदवर ५ जानेवारीपर्यंत ठाम

आंदोलकांची भूमिका; २५ जण हजर, आगाराला ४ लाख १२ हजारांचे मिळाले उत्पन्न
रत्नागिरी : एसटी बंदवर ५ जानेवारीपर्यंत ठाम
Updated on
Summary

आंदोलकांची भूमिका; २५ जण हजर, आगाराला ४ लाख १२ हजारांचे मिळाले उत्पन्न

रत्नागिरी : एसटी महामंडळाचे (msrtc)राज्य शासनात विलीनीकरण संदर्भातील पुढील सुनावणी ५ जानेवारीला होणार आहे. परंतु तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलनावर ठाम असल्याची सर्वानुमते भूमिका ठरवल्याची माहिती कृती समितीचे रमेश केळकर यांनी दिली. आम्ही संप नव्हे तर काम बंद आंदोलन, दुखवट्यामध्ये आहोत, हे न्यायालयाने मान्य केले आहे. त्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई होणार नाही. दरम्यान, कारवाईच्या भीतीमुळे आज निलंबित, सेवासमाप्तीमधील काही कर्मचारी हजर झाले असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.

रत्नागिरी : एसटी बंदवर ५ जानेवारीपर्यंत ठाम
बँकेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करणार ; नितेश राणेंची ग्‍वाही

आज मुंबईत(mumbai) सुनावणी होणार असल्यामुळे कामगार रत्नागिरी विभागीय कार्यालयाच्या बाहेर जमले होते. सुमारे २०० कर्मचारी आले होते. या वेळी कामगारांनी कामगार एकजुटीचा विजय असो, शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली. या वेळी कृती समितीच्या रमेश केळकर यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, संकष्टी चतुर्थी असल्याने आज सकाळी सर्व कर्मचाऱ्यांनी महाआरती केली. त्या वेळी गणपतीरायाला साकडेही घातले. संविधानातील ३८ कलमानुसार आम्ही संप नाही, तर हे काम बंद आंदोलन असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे, अशी माहिती कामगारांनी दिली. प्रशासन कोणतीही कारवाई करणार नाही, त्यांना न्यायालयाच्या(court) निर्णयामुळे खीळ बसली आहे. आम्ही कर्मचारी आत जाणार नाही. प्रशासनाने कर्मचाऱ्यांना प्रवेशबंदी केली होती. तसेच आवार, स्वच्छतागृह, पाणी पिण्यास मज्जाव केला होता. परंतु आता न्यायालयाच्या निर्णयामुळे आम्हाला आवार वापरता येणार असल्याचे कामगारांनी सांगितले.

रत्नागिरी : एसटी बंदवर ५ जानेवारीपर्यंत ठाम
कोल्हापूर : पुढील महिन्यात कामाला प्रारंभ शक्य

दरम्यान, आज विभागात ६२५ कर्मचारी कामावर हजर होते. यामध्ये प्रशासकीय २६०, कार्यशाळा १९५, चालक ७४, वाहक ६३, चालक तथा वाहक ३३ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तसेच १०२ कर्मचारी अधिकृत रजेवर होते. अजूनही ३०५२ कर्मचारी आंदोलनात सहभागी आहेत.

कारवाई झालेले २५ हजर

कारवाईच्या भीतीने आज सेवासमाप्ती, निलंबित, बदली कर्मचारी हजर झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. रत्नागिरी विभागात दुपारच्या सत्रामध्ये कर्मचारी हजर झाले. यामध्ये प्रशासकीय ३, कार्यशाळा ४, चालक १४, वाहक ४ असे एकूण २५ जण हजर झाले.

४ लाख १२ हजारांचे उत्पन्न

रत्नागिरी जिल्ह्यात काल (ता.२१) दापोली ४०३२, खेड १८३५, चिपळूण २६६०, गुहागर ७२, देवरुख ४६४८, रत्नागिरी २२, लांजा ७८८, राजापूर २४३९ आणि मंडणगडमध्ये १७७ अशा १६७०३ प्रवाशांनी प्रवास केला. यामुळे एसटी विभागाला ४ लाख १२ हजार ४७७ रुपयांचे उत्पन्न मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com