esakal | रत्नागिरी: आंबा घाटातून अवजड वाहतूक सुरू करा
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी: आंबा घाटातून अवजड वाहतूक सुरू करा

रत्नागिरी: आंबा घाटातून अवजड वाहतूक सुरू करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी: आंबा घाटात बंद असल्याने पंधरा दिवसांपासून अणुस्कुरा घाटातून अवजड वाहनांची वाहतुक सुरू आहे. दिवसाला सुमारे १०० अवजड गाड्यांची वाहतूक अणुस्कुरा घाटातून होते. यामध्ये डिझेल खर्च वाढला असून वाहतुक व्यवसाय करणे मुश्किल झाले आहे. तरी अवजड वाहनांसाठी तत्काळ आंबा घाट सुरू करावा, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा मोटार मालक असोसिएशनने मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हेही वाचा: 'तारीख ठरवली राणेंनी पण श्रेय घेतलं राऊतानी'

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबा घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळली. काही दिवसानंतर दरडी हटविण्यात आली; मात्र रस्ता खचल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्तीचे काम सुरू आहे. छोट्या वाहनांसाठी हा मार्ग खुला आहे; मात्र अवजड वाहतुकीला बंदी घातली आहे. दक्षता म्हणून अवजड वाहतूक रोखण्यासाठी लोखंडी कमान लावली आहे. जिल्हा मोटार मालक असोसिएशनतर्फे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या ठिकाणी फिनोलेक्स, अल्ट्राटेक, जिंदल कंपनीमधून माल वाहतूक केली जाते.

साधारण दिवसाला १०० गाड्यांची वाहतूक या मार्गावरून होते. आंबा घाट बंद असल्याने कोल्हापूरमार्गे जाणारी वाहतूक अणुस्कुरा घाटातून करावी लागत आहे. किलोमीटर वाढत असून गाडीच्या डिझेल खर्चात मोठी वाढ झाली आहे. याबाबत तातडीने निर्णय घेऊन आंबा घाट अवजड वाहतुकीसाठी सुरू करावा, अशी मागणी असोसिएशनने निवेदनाद्वारे केली आहे. तसे निवेदन मंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांना दिले.

loading image
go to top