
रत्नागिरी : ३६ विद्यार्थ्यांची एकाच वेळी टीसीएसमध्ये निवड
रत्नागिरी : फिनोलेक्स अॅकॅडमीच्या ३६ विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या आंतरराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण जून २०२२ मध्ये पूर्ण होणार असून त्यापूर्वीच त्यांची निवड नोकरीसाठी झाली आहे. ३६ विद्यार्थ्यांची एकाच वेळी निवड होणारे हे कोकणातील एकमेव महाविद्यालय ठरले आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे अशी केमिकल- भार्गवी केतकर, इलेक्ट्रिकल- श्रीकृष्ण शिगवण, शुभम जंगम, जस्मिन पवार, वरद करंदीकर, आदित्य जाधव, मुक्ती कांबळे, विशाल सिंग, सुजित खोपटकार, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन-सलोनी सावंत, जयेश रेडीज, समर्थ बलूगरी, प्रणव शीतप, आयटी- राज वाडकर, राधिका आंबावकर, युक्ता बापर्डेकर, प्राजक्ता सोमण, प्रणेता बांदेकर, अनिकेत परब, विघ्नेश तेंडोलकर, सर्वेश पांगम, सना मजगावकर, शुभम मंगोरे, एमसीए- फातिमा मुल्ला, श्रुती घाडीगावकर, मेकॅनिकल- कुणाल परब, अथर्व महाले, वैशाली आरेकर, फरीद काझी, गुरुनाथ राणे, ऊसमा खान, प्रणव दामले, गोविंद पणशीकर, पूजा जाधव, श्रावण म्हापणकर आणि प्रणय सावंत.
हेही वाचा: सांगली : साखर दर तेजीत; एफआरआपीसाठी मात्र कसरतच
निवड प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता, शिकत असलेल्या विषयाचे आकलन, प्रोग्रामिंग स्किल या सर्व पात्रता फेरीतून गेल्यानंतर अंतिम मुलाखतीसाठी निवड केली जाते. या संदर्भात होप फाउंडेशनच्या अध्यक्षा अरुणा कटारा म्हणाल्या, महाविद्यालयाने प्लेसमेंटमध्ये सातत्य राखले आहे. तंत्रशिक्षणाची आवड, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन यामुळेच आंतरराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीमध्ये निवड होऊ शकते, हे दाखवून दिले आहे. यापुढेही भरपूर यश संपादन करतील. या सर्व प्रक्रियेमध्ये फिनोलेक्स अॅकॅडमीच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट टीमने विशेष मेहनत घेतली. या यशाबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
जुलै २०२१ पासून आत्तापर्यंत १२५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. तसेच गेल्या शैक्षणिक वर्षात २६६ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली. इन्फोसिस, विप्रो, कॅपजेमिनी, कॉग्निझंट, फिनोलेक्स अशा ३५ पेक्षा जास्त नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली.
Web Title: Ratnagiri Tcs Recruitment And Jobs
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..