Teacher Dies of Heart Attack
esakal
रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात मन हेलावून टाकणारी घटना घडलीये. वर्गात विद्यार्थ्यांना अध्यापन करत असतानाच शिक्षकांना अचानक चक्कर येऊन ते कोसळले आणि त्यातच त्यांचे निधन (Teacher Dies of Heart Attack) झाले. विद्यार्थ्यांसमोरच ही घटना घडल्याने संपूर्ण शाळेत भीती आणि हळहळ पसरली आहे.