Ganpatipule 102 crore development plan
esakal
रत्नागिरी : जिल्ह्याला पर्यटनक्षेत्रात अग्रस्थानी नेण्यासाठी मालगुंड येथील नियोजित प्राणी संग्रहालयाची निविदा प्रक्रिया अंतिम झाली आहे. येत्या दोन वर्षांत हे संग्रहालय सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी खुले केले (Malgund zoo project latest update) जाईल. भाट्ये समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणासाठी १५ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी पाच कोटी रुपये मंजूर झाले तर गणपतीपुळे विकास आराखडा मे २०२७ पर्यंत पूर्ण केला जाईल, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.