रत्नागिरी : दिव्यांग प्रगतीला कोण देईल उभारी

आरएचपीतर्फे व्हीलचेअर; मेंदूवरील शस्त्रक्रियेनंतर अपंगत्व
दिव्यांग विद्यार्थी
दिव्यांग विद्यार्थीsakal

रत्नागिरी : मेंदूवरील शस्त्रक्रियेने तिच्यावर अंथरुणावर खिळण्याची वेळ आली. फिजिओथेरपीने थोडी सुधारणा झाली; परंतु कमरेखाली अपंगत्वामुळे ती फिरू शकत नव्हती, कामे करणे शक्यच नव्हते; परंतु आता रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने तिला मदतीचा हात दिला आहे. तिला व्हिलचेअर देऊन स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन दिले आहे. आता ती घरात फिरू लागली असून हळूहळू बाहेरही फिरायला लागेल. तिला पुढे अजून शिक्षण घ्यायचे आहे. याकरिता सहकार्य करण्याचे आवाहन फाउंडेशनने केले आहे.

प्रगती विजय गुरव (रा. देवधे, ता. लांजा) हिच्या जन्मत:च डोक्यामागील भाग मऊ होता. याचा तिला काही त्रास नव्हता, ती घरातील सर्व कामे करत होती. जेवण बनवणे, भांडी, घासणे, विहिरीवरून पाणी आणणे, लाकडे आणणे, शेतीच्या कामात मदत करणे आदी सर्व कामे ती कोणताही त्रास न होता करत असे; परंतु पुढे विवाहकार्य किंवा शिक्षणासाठी अडचण येऊ नये, म्हणून २०१७ मध्ये मुंबईत नामांकित रुग्णालयात मणक्यात इंजेक्शन देऊन मणक्यातील पाणी काढले नंतर मेंदुवरील गाठीचे ऑपरेशनही झाले. त्यावेळी तिने दहावीची परीक्षाही दिली होती.

शस्त्रक्रियेनंतर ती शुद्धीवर आली, तेव्हा तिला कळलं की तिच्या शरीराला संवेदना आहेत, पण ती उठू शकत नाही, बसू शकत नाही, तिला चालता येत नाही, एखादी हवी असणारी वस्तू ती स्वतःहून उचलू शकत नाही. हे लक्षात आल्यावर ती पूर्ण खचून गेली, आता तिला सेरेब्रल पाल्सीचे व्यंगत्व नशिबी आल्याचे सांगण्यात आले. तिच्यासोबत तिचे आई- वडील देखील कोलमडले.

तिच्यावर पुढील उपचारांसाठी परिस्थिती नसतानाही गुरव कुटुंबीयांनी विरारला भाड्याने खोली घेतली. तिचे बाबा गावाला तिच्या लहान भावंडांना सांभाळायला परत आले. प्रगतीसोबत तिची आई फक्त थांबली. तिला दररोज परेलला थेरपीसाठी एकटीने रेल्वेने आणायची. यानंतर ती दुसऱ्याच्या मदतीने उठून उभी राहण्याचा प्रयत्न करू लागली. धरून धरून चालू लागली होती. प्रगतीला आरएचपी फाउंडेशनने व्हीलचेअर द्यायचे ठरवले. विशेष म्हणजे याकरिता संस्थेचा सदस्य दिव्यांग प्रितम कदम याची मदत झाली. त्याने स्वतःकडील एक व्हीलचेअर आपल्यासारख्या गरजू व्यक्तीला द्यायचे, असे त्याने ठरवले होते. ही व्हीलचेअर प्रगतीला देण्यात आली.

पाखाडी विरोधामुळे बांधली नाही..

घरात जाण्यासाठी चिरेबंदी पाखाडी किंवा सपाटीकरणाची गरज आहे. मंजूर झालेली पाखाडी विरोधामुळे बांधता आलेली नाही. त्यामुळे ही पाखाडी लवकरात लवकर होण्यासाठी ग्रामपंचायत आणि सरपंचांनी लक्ष घालण्याची मागणी आरएचपी फाउंडेशनने केली आहे.

आरएचपीतर्फे प्रशिक्षण

आरएचपी फाउंडेशनचे सदस्य समीर नाकाडे यांनी प्रगतीला व्हीलचेअरवर कसं बसायचं, स्वतः व्हीलचेअर कशी ढकलायची, ब्रेक कसा लावायचा, हे शिकवले. घरच्यांना व्हीलचेअर पायऱ्यांवरून उतवायची, चढवायची, घराबाहेर कशी घ्यायची, याचे प्रशिक्षण दिले. व्हिलचेअरमुळे तिच्या चेहऱ्‍यावर आनंद पाहायला मिळाला. हळूहळू बाहेरही फिरायला लागेल. तिला पुढे अजून शिक्षण घ्यायचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com