
Jagbudi River Ratnagiri : सह्याद्रीच्या पट्ट्यात कांदोशी, बिरमणी येथील उंच भागासह खेड तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे. त्यामुळे जगबुडी आणि नारंगी नदीचे पाणी इशारा पातळीच्या वरून वाहू लागले आहे. या नद्यांना आलेल्या पुराचे पाणी खेड बाजारपेठेतील वाल्की गल्लीपर्यंत पोहोचले असून, खेड-दापोली मार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालिकेच्या वतीने तीनवेळा भोंगा वाजून शहरवासीयांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.