Professor Girish Bhatade, who received a PhD for his research on wild edible plants and their nutritional and medicinal properties in Ratnagiri.
esakal
राजापूर: रत्नागिरी जिल्ह्यातील जंगली खाद्य वनस्पती आणि त्यांच्या पोषणमूल्यांवर सखोल शास्त्रीय अभ्यास करीत प्रा. गिरीष भातडे यांनी संशोधन केले आहे. त्या संशोधनाच्या आधारे त्यांनी आधुनिक जीवनशैलीमुळे हळूहळू विस्मृतीत जात असलेल्या मात्र, औषधी गुणधर्मांमुळे उपयुक्त असणार्या पारंपरिक वनस्पती ज्ञानाचे दस्तऐवजीकरण केले आहे. स्थानिक वनसंपदेतील अज्ञात पैलूंचा शोध घेऊन पारंपरिक ज्ञानाला आधुनिक विज्ञानाची जोड देत त्यांनी संशोधन केले आहे. जिल्ह्यातील जंगली खाद्य वनस्पतींचे पारंपरीक ज्ञान, त्यांचे औषधी महत्व आणि निवडक भूगर्भीय वनस्पतींच्या पोषणमूल्यांचा शास्त्रीय अभ्यास करणारे त्यांचे हे संशोधन कोकणच्या जैवविविधतेच्या जतन अन् संवर्धनाच्यादृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे.