रत्नागिरी : मोटार अपघातात दोन महिला ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघातात दोन महिला ठार

रत्नागिरी : मोटार अपघातात दोन महिला ठार

देवरूख: देवरुख-रत्नागिरी मार्गावरील वाशी फाटा येथे मोटार उलटून झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला; तर दोघे जखमी झाले. दीपिका दीपक सावंत (वय ५०) व भागीरथी दगडू सावंत (८५) अशी ठार झालेल्या महिलांची नावे आहेत. प्रकाश हळदणकर व शुभम दीपक सावंत हे जखमी झाले आहेत.

पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार या अपघाताची फिर्याद प्रथमेश प्रकाश हळदणकर (रा. निवेबुद्रुक पाष्टेवाडी) यांनी दिली आहे. वाशीतर्फ देवरूख येथील निनावी देवी मंदिरात धार्मिक कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी सावंत कुटुंबीय काल (ता. २६) मुंबईहून गावी परतत होते. प्रथमेश प्रकाश हळदणकर हे मोटार (एमएच-०२- सीआर-५२४१) घेऊन मुंबईहून वाशीच्या दिशेने येत होते. वाशी फाटानजीक हळदणकर यांचे मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी गटारीमध्ये जाऊन उलटली.

हा अपघात काल मध्यरात्री झाला. अपघातामध्ये दीपिका सावंत व भागीरथी सावंत या ठार झाल्या. प्रकाश हळदणकर व शुभम सावंत हे जखमी झाले आहेत. अपघाताची खबर मिळताच देवरुख पोलिसांनी घटनास्थळी

जाऊन पाहणी व पंचनामा केला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दीपिका सावंत व भागीरथी सावंत यांच्या संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. प्रथमेश हळदणकर याच्यावर देवरूख पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कायदा कलम ३०४ (अ),२७९, ३३७, ३३८ मोटारवाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक बाळकृष्ण जाधव करीत आहेत.

Web Title: Ratnagiri Women Killed Car Accident

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top