रत्नागिरी : अश्‍लील छायाचित्र बनवून तरुणाला केले ब्लॅकमेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 blackmailed by making obscene pictures

रत्नागिरी : अश्‍लील छायाचित्र बनवून तरुणाला केले ब्लॅकमेल

खेड: सुलभ कर्ज देतो असे सांगून एका संस्थेमार्फत तरुणांकडून ऑनलाईन घेण्यात आलेल्या कागदपत्र व फोटोंचा गैरवापर केला. त्या तरुणाच्या फोटोशी संगणकावर छेडछाड करत अश्‍लील फोटो तयार करून धमक्या देत ब्लॅकमेल करण्यात आल्याची तक्रार खेड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

इंटरनेटमुळे अनेक कंपन्या आपल्या जाहिराती विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून करत आहेत. झटपट व सुलभ कर्ज देणाऱ्या जाहिराती सध्या मोठ्या प्रमाणात येत आहेत. अशाच एका पाच हजार ते एक लाख रुपयांपर्यंत कर्ज देणाऱ्या कंपनीमार्फत खेडमधील एका तरुणाने आपला फोटो व आधारकार्डची प्रत देऊन कर्ज घेतले होते; मात्र त्या तरुणाच्या फोटोचा गैरवापर करून अज्ञात इसमाने अश्‍लील फोटो तयार केले व ते फोटो सोशल मीडियावर पसरवून बदनामी करण्याची धमकी देत त्या तरुणाकडे पैसे मागणी केली.

संबंधित तरुणाने खेड पोलिस ठाण्यासह जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्याकडे तक्रार केली. खेडमध्ये अनेक तरुणांचे अश्‍लील फोटो या अज्ञात ब्लॅकमेल करणाऱ्या लोकांनी बनवून पाठवले आहेत. सुलभ कर्जाच्या ऑनलाईन जाळ्यात अनेक तरुण आणि तरुणी तसेच गृहिणी बळी पडल्या आहेत. खेडमधीलच एका महिलेने १० हजार रुपयांचे कर्ज अशा प्रकारे घेतले होते. ते फेडल्यानंतर देखील तिला ब्लॅकमेल करून याच फायनान्सवाल्यांनी त्या महिलेकडून लाखो रुपये उकळले असल्याची चर्चा आहे.

कोणी ब्लॅकमेल करत असल्यास संपर्क करा

ऑनलाईन कर्ज घेऊन ज्या महिलांना, तरुणींना तसेच तरुणांना ब्लॅकमेल करण्यात येत आहे त्यांनी घाबरून जाऊ नये. मानसिक त्रास करून न घेता खेड पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी. तसेच, सायबर सेल ८८३०४०४६५० या नंबरवर व्हॉटस्‌ अॅपद्वारे तक्रार दिली तरी त्याची दखल घेऊ, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी केले आहे.

Web Title: Ratnagiri Young Man Blackmaile Making Obscene Picture

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..