रायपाटणमध्ये यांची शिवसेनेला सोडचिट्टी; भाजपमध्ये प्रवेश

रायपाटणमध्ये यांची शिवसेनेला सोडचिट्टी; भाजपमध्ये प्रवेश

राजापूर - अंतर्गत संघर्षातून रायपाटणचे शाखाप्रमुख मनोज गांगण, सरपंच राजेश नलावडे यांच्यासह आठ सदस्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. समृद्ध कोकणचे अध्यक्ष संतोष गांगण यांच्या नेतृत्वाखाली व भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांच्या उपस्थितीत जिजामाता विद्यामंदिरच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. 

मागील अनेक वर्षे रायपाटण गाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मात्र, गेल्या दोन वर्षापासून पक्षांतर्गत संघर्ष सुरू होता. त्यामुळे शिवसेनेतील एक मोठा गट शिवसेना सोडून भाजपात प्रवेश करणार अशा चर्चा झडत होत्या. सेनेच्या वरिष्ठ पातळीवरुन रायपाटणमधील सुरू असलेला वाद मिटवला जाईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे काहीही घडले नाही. अखेर सेनेतील संतप्त शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला. हा प्रवेश समृद्ध कोकणचे अध्यक्ष व काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश करणारे संतोष गांगण यांच्या नेतृत्वाखाली झाला.

या वेळी तालुकाध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत लिंगायत, प्रसाद पाटोळे, एकनाथ परब, निशिगंधा सुतार, अभिजित गुरव आदी उपस्थित होते. प्रवेशकर्त्यांमध्ये रायपाटणचे शाखाप्रमुख मनोज गांगण, सरपंच राजेश नलावडे यांच्यासह आठ ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच संदीप कोलते, गावचे तंटामुक्ती अध्यक्ष जनार्दन गांगण, रायपाटण गावच्या श्रीवडची आई मंदिराच्या न्यासाचे अध्यक्ष श्रीधर गांगण, गावच्या सोसायटीचे चेअरमन संदीप नेवरेकर, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रभाकर पळसुलेदेसाई मनसेचे शाखाप्रमुख नीलेश चांदे, भास्कर गांगण, प्रदीप नेवरेकर, महादेव शिंदे, संतोष चांदे, अशोक चांदे आदींचा समावेश आहे. 

""आपण राष्ट्रव्यापी पक्षात सामाविष्ट होण्याचा जो निर्णय घेतलात तो चांगला असून आपल्याला योग्य तो न्याय दिला जाईल. निरपेक्षपणे काम करणारे मनोज गांगण यांच्यासारख्या कार्यकर्त्यांचा पक्षात योग्य तो सन्मान करू'' 
- दीपक पटवर्धन,
भाजप जिल्हाध्यक्ष  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com